#NawabMalik #OBCReservation #StateGovernment #MaharashtraTimes<br />ओबीसी आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणूका घेऊ नये या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आजही ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जोपर्यंत ओबीसींचा डेटा उपलब्ध होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका या राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयाचा विचार निवडणूक आयोग करेल, अशी अपेक्षाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.